Kuni Jaal Ka Sangal Ka

कुणी जाल का, सांगाल का
Work
Language

कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली