कोकीळ कुहुकुहु बोले
तू माझा तुझी मी झाले
ऋतुराजा तुझी वासंती
तरुतळी इथे एकांती
कर कोमल देता हाती
चांदण्यांत दिवसा न्हाले
मोहरून डहाळीवरती
अपुली हिंदोळत प्रीती
निर्झरांत टिपण्या मोती
पाखरू जीवाचे आले
तू येता सखया जवळी
फुलवेल तरुला कवळी
मधु मरंद भरतो कमळी
अंतरात मिटता डोळे