Khel Tuza Nyara

खेळ तुझा न्यारा, प्रभु रे
Work
Language

तुझे सर्वरंगी रूप उदारा
कळले सांग कुणाला
खेळ तुझा न्यारा, प्रभु रे
खेळ तुझा न्यारा

स्वार्थाभवती दुनिया फिरते
बेईमान ठरते भलाई
सौद्यासाठी जुळते नाते
फसवा भावफुलोरा

आशेमधुनी जीवन फुलते
मरणाशी अडते पाऊल
हे मायावी मृगजळ खोटे
उरतो दूर किनारा

दोन दिसांची सगळी नाती
कुणी उरे न अंती सोबती
पैलतीराची हाक ऐकता
स्मरतो एक सहारा