कसली जीवाला भूल पडे
हरीच्या मुरलीवर जीव जडे
श्यामल श्यामल मेघा बघुनी
श्याममयी मी जाते बनुनी
स्वप्न म्हणू की हे जागेपण
माझ्यासंगे नाचे मोहन
श्याम श्याम श्याम
घनःश्याम श्याम श्याम
श्याम श्याम श्याम
मुखी हेच नित्य नाम
संसार मनातुनी गळुन पडे
मज वेडीला निंदा वंदा
मी तर वरिले बाळ मुकुंदा
लाज ना मजसी मजसी ना भीती
माझी हरीवर अक्षय प्रीती
श्याम श्याम श्याम
घनःश्याम श्याम श्याम
श्याम श्याम श्याम
मुखी हेच नित्य नाम
त्याच्याविण माझा श्वास अडे