Jeevan Gagan Mee Pakharu

जीवन गगन मी पाखरू
Year
Language

जीवन गगन मी पाखरू
स्वच्छन्द लागे सहचरू
झेपावते, आसावते, त्याला कसे आवरू

हाती तुझा दे हात गे
ओठांवरी दे ओठ गे
ये साजणी, नाही कुणी, आता नको बावरू

दोघे प्रवासी प्रीतीचे
खोट्या जगाच्या नीतीचे
थोडे धुके, सारे फिके, ही शाल ये पांघरू

एकांतकाली भेटलो
मी रोमरोमी पेटलो
बेधुंद तू, बेधुंद मी, साऱ्या जगा विस्मरू