Ja Muli Shakuntale Sasri

जा मुली शकुंतले सासरी
Work
Language

जा मुली शकुंतले सासरी
आवरी डोळ्यांमधल्या सरी

वडील मंडळी असतील कोणी
वागच तयांच्या अर्ध्या वचनी
सवतीला हि मानूनी बहिणी
राही सदा हासरी

पतिसेवा हे ब्रीद आपुले
देवाहून ती थोर पाऊले
रागावून ते जरी बोलले
बोलू नको त्यावरी

दोन्ही कुळांचे नाव वाढवी
पतिव्रतेची पदवी मिळवी
संसारी तुज वाण नसावी
लक्ष्मी तू साजरी