He Gard Nile Megh

हे गर्द निळे मेघ
Work
Year
Language

हे गर्द निळे मेघ
बिलगून जशी वीज
मन आज दिवाणे गं

ताऱ्यांत असे जाग
धरणीस नसे नीज
हळू बोल सखे तू गं

हा गंध-खुळा वारा
जीवाला नसे थारा
हा चंद्र झुकोनिया
करी गोड इशारा गं

घे शाल मिठीची ही
बिलगून अशी राही
रे चोर खुणांनी का
हसतात दिशा ह्या गं

मी होऊनिया मुरली
रे आले तुझ्या जवळी
हे ओठ मुरारीचे
किती काळ उपाशी गं