Hari Bhajani Rangali

हरिभजनी रंगली
Work
Language

कामधाम संसार विसरली
हरिभजनी रंगली, राधिका हरिभजनी रंगली

गोकुळ वदले राधा वेडी
संसाराची माया तोडी
जगावेगळे छंद आवडी
कुंजवनी राधिका पाहिली

हरिभजनाने तुटले बंधन
मुक्त राधिका झाली पावन
गोकुळ बनले मग नंदनवन
वाजवितो मुरली वनमाली

आत्मरूप ते रूप हरीचे
मर्म उमजले संसाराचे
धान्य राधिका तिने पाहिली
विश्वस्वरूपी मूर्ति सावळी