घननिळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा
सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा
घननिळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा
सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा
ghanniḻā, laḍivāḻā, jhulvū nako hiṅdoḻā
suṭlī veṇī, kes mokḻe
dhūḻ uḍālī bharle ḍoḻe
kājaḻ gālī sahaj oghḻe
yā sāryāchā udyā gokuḻī, hoīl arth nirāḻā
sāṅjveḻ hī āpaṇ doghe
avghe saṅśhay gheṇyājoge
chaṅdr nighe bagh jhāḍāmāge
kāliṅdīchyā taṭī kheḻto gopsutāṅchā meḻā