गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला
मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी
माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी
ge māybhū tujhe mī pheḍīn pāṅg sāre
āṇīn ārtīlā he sūry, chaṅdr, tāre
āī, tujhyāpuḍhe mī āhe ajūn tānhā
śhabdāt soḍ mājhyā ātā haḻūch pānhā
āī, tujhyāpuḍhe hī mājhī vythā kaśhālā ?
jevhā tujhyāmuḻe hyā janmās arth ālā
mī pāydhuḻ gheto jevhā tujhī jarāśhī
mājhī lalāṭreṣhā bante pryāgkāśhī
āī, tujhī aśhī mī gāīn roj gāṇī
mājhī tujhyā dudhāne gelī bhijūn vāṇī