गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी
ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे जाललहरी सुंदर
रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला
तू वनराणी दिसे भुवनी या तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहनी पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चाल माझ्या घरी