गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला
आले वनावनात सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी भरला प्याला
वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख
लिहितात अंगुलींनी वाऱ्यात प्रेमलेख
संकेत प्रेमिकांना दुरुनी आला
गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला
आले वनावनात सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी भरला प्याला
वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख
लिहितात अंगुलींनी वाऱ्यात प्रेमलेख
संकेत प्रेमिकांना दुरुनी आला
gagnā gaṅdh ālā, madhumās dhuṅd jhālā
phulle palāśh rānī jaḻtyā jvālā
āle vanāvnāt sahkār mohrūn
bhramrās maṅjirīchī chāhūl ye durūn
bharlā maraṅd koṣhī bharlā pyālā
velīs aṅkurāṅchī valye kitī surekh
lihitāt aṅgulīṅnī vāऱyāt premlekh
saṅket premikāṅnā durunī ālā