दूर किनारा राहिला, बेभान वारा धावला
माझी रे, माझी रे
तुफानी लाटांनी दर्याच्या थाटांनी
बेधुंद झाली जिंदगी
उदास होऊनि असा मी धावुनी
केली प्रभूची बंदगी
या जलधारा जीवनधारा हो माझी रे
साथी रे सुखाचे, दिल्या घेतल्याचे
अंती कुणी ना संगती
दुःख झेलता मी, कुणी नाही कामी
सारे दुरुनी पाहती
या जलधारा जीवनधारा हो माझी रे