Dole kashaasaathee? kashaasaathee?

डोळे कशासाठी? कशासाठी?
Work
Language

डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी

आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी

वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी

असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी

ḍoḻe kaśhāsāṭhī? kaśhāsāṭhī?
tulā sāṭhvūn miṭūn gheṇyāsāṭhī

ālā bharun pāūs, nako ekṭā jāūs
ālī sarī kaśhāsāṭhī, tulā bilgūn bhijūn jāṇyāsāṭhī

nāv tujhe manātle, chāṅdṇech rānātle
śhabd kaśhāsāṭhī, tulā āṭhvūn bharun yeṇyāsāṭhī

vel mohrun ālī, phule aṅgabhar jhālī
vārā kaśhāsāṭhī, gaṅdh vanātūn pākhru hoṇyāsāṭhī

asā tujhā bharavsā, chāṅdaṇyāṅchā kavaḍsā
oṭh kaśhāsāṭhī, thoḍe tharārun juḻūn jāṇyāsāṭhī