Devroop Hou Sagle

देवरूप होऊ सगळे
Work
Language

देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे

सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पांचामुखी ईश्वर बोले

भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवुनी पंखी, एकरूप पक्षी झाले
गळ्यामध्ये घालुन गळे मृत्युलाच मारून गेले

वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा, एकलक्षी लावुनि डोळे