देह जावो अथवा राहो
पांडुरंगी दृढ भावो
चरण न सोडी सर्वथा
आण तुझी पंढरीनाथा
वदनी तुझे मंगळनाम
हृदयी अखंडित प्रेम
नामा म्हणे केशवराजा
केला पण हा चालवी माझा
देह जावो अथवा राहो
पांडुरंगी दृढ भावो
चरण न सोडी सर्वथा
आण तुझी पंढरीनाथा
वदनी तुझे मंगळनाम
हृदयी अखंडित प्रेम
नामा म्हणे केशवराजा
केला पण हा चालवी माझा
deh jāvo athvā rāho
pāṅḍuraṅgī dṛḍh bhāvo
charaṇ na soḍī sarvthā
āṇ tujhī paṅḍhrīnāthā
vadnī tujhe maṅgaḻnām
hṛdyī akhaṅḍit prem
nāmā mhṇe keśhavrājā
kelā paṇ hā chālvī mājhā