Bai Mee Patang Udvit Hote

बाई मी पतंग उडवित होते
Work
Language

चढाओढीने चढवित होते
गं बाई मी पतंग उडवित होते

होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा बारा
एकमेकांना अडवित होते

माझे आभाळी जडले डोळे
पडला पदर भुईवर लोळे
ऊर कोपरांनी दडवित होते

काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळी घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते

माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते