बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे
दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे
गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे
बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे
दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे
गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे
baghat rāhu de tujhyākḍe
āj akalpit bheṭ ghaḍe
duḥakh na urle sarlī bhītī
aṅgāṅgātūn bharlī prītī
dhuṅd gaṅdh hā chahūkḍe
gīt sphure kaṅṭhātun komal
paṅkhāṅnā ye āj nave baḻ
ullaṅghāyā uṅch kaḍe
saty bheṭle sauṅdaryālā
aṅkur phuṭle mādhuryālā
harṣhsāgrī gagan buḍe