Baba Thamb Na Re Tu (Ventilator)

बाबा, थांब ना रे तू बाबा
Work
Year
Language

बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना
कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना
साद ही घालते लाडकी तुला
जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा

दैव होता तू, देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणी होते मी, वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू
आज तू फेडू दे पांग हे मला
जगण्या रे मला अजूनही तूच हवा
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा

पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा
बाबा बोल ना, बोल ना, बोल ना
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा