अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले ?
ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
'कोण हवे हो' म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले
बोलत बसता वगळुन मजला
गुपित चोरटे ऐकु कशाला
जाण्याचा ते करुनि बहाणा
गुपचुप माझ्या मनात लपले
नीज सुखाची तुम्हा लागली
मंद पाउली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरासी नच बोलु दिले