Anuragache Themb Zelati

अनुरागाचे थेंब झेलती
Work
Language

अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे

मंतरला हा कुंज लाजरा
महीवरला सुमभार हासरा
झिरमि झिरमिर पाऊसधारा गाती पाऊसगाणे

मधुमय हा मुदगंध वाहतो
बहरुनिया वनवृंद नाचतो
तरुवेलींना असे बिलगती अधिऱ्या प्रीती-सुखाने