अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले
दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले
एकदा ज्यातून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले, ते स्नेह तंतू आतले
शेवटी मंदावलेल्या वादळी वाऱ्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले
aṅtrīchyā gūḍhgarbhī ekdā je vāṭle
te prem ātā āṭle, sakhī prem ātā āṭle
dūr sonerī sukhāche pāhile ābhās mī tū
raṅgle ābhāḻ pūrvī, tech ātā phāṭle
ekdā jyātūn māge sūr saṅvādī nighāle
vaṅchnene toḍle, te sneh taṅtū ātle
śhevṭī maṅdāvlelyā vādḻī vāऱyāprmāṇe
rāhṇe jhāle divāṇe, te gīt gāṇe koṭhle