Angani Gulmohar Phulala

अंगणी गुलमोहर फुलला
Work
Language

अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला

गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला

ते डोळे ती हसरी जिवणी
जपली मी तर अजुन चिंतनी
आठवा येता वरुनी माथी मोहर ओघळला

नजरभेट ती ओळख थोडी
अवीट त्यातील अबोल गोडी
वसंत आला, याला तुम्हीही, कोकिळ कुजबुजला