Ag Pori Sambhal Daryala

अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी
Work
Language

अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी
लाट पिरतीची भन्नाट होऊन आभाली घेई भरारी

नाय भिनार ग येऊ दे पान्याला भरती
माज्या होरीचं सुकान तुझ्याच हाती
नाव हाकीन मी कापीत पाऊसधारा
मनी ठसला रं तुजा ह्यो मर्दानी तोरा
जाल्यांत गावली सोनेरी मासली
नको करू शिरजोरी
अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

तुझ्या डोल्यांत ग घुमतोय वादळवारा
तुझ्या भवती र, फिरतोय मनाचा भवरा
तुला बगून ग उदान आयलंय मनाला
तुझ्या पिरतीचं काहूर जाली जीवाला
सुटणार नाय ग तुटणार नाय ग
तुजी नि माजी जोरी
अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

मी आनिन तुला जरतारी अंजिरी सारी
मला पावली र पिरतीची दौलत न्यारी
मी झुंजार, साजिरी तू माजी नारी
तुज्या संगतीनं चाखिन सर्गाची गोरी
थाटांतमाटांत गुलाबी बंगला
बांधूया दर्याकिनारी
अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी