Aata Majhi Chinta Tuj

आता माझी चिंता तुज नारायणा
Work
Language

आता माझी चिंता तुज नारायणा
रुक्मिणीरमणा वासुदेवा

द्रौपदीसंकटी वस्त्रें पुरविली
धाव त्वां धेतली गजेंद्रासी

उपमन्यूची त्वां आळी पुरविली
अढळपदी दिली वसती ध्रुवा

नामा म्हणे करा करुणा केशवा
तू माझा विसावा पांडुरंगा