आले मनात माझ्या खुलली क्षणात आशा
सांगावया नको ते तू जाणलीस भाषा
या मूक भाषणाचा भावार्थ सर्व साधा
माझी मलाच ज्याची जडली अमोल बाधा
बाधेत भावनेची प्रणयात होई वर्षा
माझ्या मनातले हे नवनीत स्वप्न भोळे
प्रीतीस जाग येता साकार आज झाले
अधरी हसून बोले ही गोड हास्यरेषा