Aai (Photocopy)

ए आई, तू भासे ठाई ठाई
Work
Year
Language

माई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन सावली सुखाची ममतेची छाया
तुला आठवतो मनी साठवतो
दिसे आसवांतही तू मला
ए आई, तू भासे ठाई ठाई, आई

तू नदी मायेची लाडकी तू मला
तूच आई हवी जन्मोजन्मी मला
झोपी गेले हे जग, झोप येईना बघ
गा ना तू अंगाई
तुला आठवतो मनी साठवतो
दिसे आसवांतही तू मला
ए आई, तू भासे ठाई ठाई, आई

सांग आई साद देतो होतो हा आभास का
अवती भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा
माई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन सावली सुखाची ममतेची छाया
तुला आठवतो मनी साठवतो
दिसे आसवांतही तू मला
ए आई, तू भासे ठाई ठाई, आई