Aai Mala Nesav Shalu Nava

आई मला नेसव शालू नवा
Language

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा

बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा ग त्यावरी
मोकळ्या बटा ह्या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा

डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानांत घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुन माझी मी आईन्याशी थांबते
गोऱ्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा

मज पहावयास येतील ग कोण हे
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणांस त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई उरी या घुमतो ग पारवा